नाशिक - देशप्रेम व्यक्त करण्याबरोबरच निसर्ग संवर्धन करणेही गरजेचे - अजय बोरस्ते

कारगील विजय दिनानिमित्त चामरलेणी येथे शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- पाकिस्तानी घुसखोरांनी भारतातील दास,कारगील या भागावर ताबा घेतला होता.या घुसखोरांना भारतीय सैनिकांनी हुसकावून लावले व 26 जुलै 1999 रोजी विजय मिळवला. म्हणून दरवर्षी 26 जुलै हा भारतात'कारगील विजय दिन'म्हणून साजरा करण्यात येत असतो.या घुसखोरांना हुसकावून लावताना भारतातील ५२७ जवान शहीद झाले होते.या शहिदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिवसेना क्रीडा विभागाच्या वतीने ५२७ वृक्षांचे रोपण शिवसेना उपनेते नगरसेवक अजय बोरस्ते,नगरसेवक प्रवीण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमात शिवसेना जिल्हा क्रीडा प्रमुख अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे,राजू शिंदे,अस्मिता मोगल, रमेश मारवाडी,रमेश क्षत्रिय,दादा पठाडे,विजया दुधारे,दीपक निकम,ज्योती निकम,भूषण भटाटे, यांच्यासह बोरगड एअरफोर्सचे कुशवाह व इतर अधिकारी,अनेक क्रीडाप्रेमी व खेळाडू,तसेच ए टी पवार आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव यांच्यासह आश्रम शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या