नाशिक - टाकळी-संगम पूल जोडरस्त्याच्या विकासकामांना वेग; नाशिककरांसाठी पर्यायी वाहतूक

नाशिक :- नाशिक पूर्व विभागातील विजय ममता चौक ते टाकळी गाव ते संगम पूल (घाट प्रवेशद्वार/साधुग्राम जोडमार्ग) या महत्त्वपूर्ण मार्गावरील विविध पायाभूत सुविधा विकासकामांना गती देण्यात आली आहे.सुमारे २.०५३ किलोमीटर लांबीच्या या डांबरी रस्त्यावर भूमिगत आणि पृष्ठभागावरील नागरी सुविधांची कामे समन्वयाने सुरू असून, कामे सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी वाहतूक वळविण्याचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे.या मार्गावरील ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) आणि महा आयटी सीसीटीव्हीशी संबंधित काम पूर्ण झाले आहे.तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणारे स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे काम प्रगतीपथावर आहे.याशिवाय, मुकणे–गंगापूर जलवाहिनीशी संबंधित कामही नियोजनानुसार प्रगतीपथावर आहे.
कामांची सद्यस्थिती
कामाचे स्वरूप
स्थिती
ओएफसी व महा आयटी सीसीटीव्ही 
१००% पूर्ण
स्टॉर्म वॉटर ड्रेनेज 
काम प्रगतीपथावर
मुकणे–गंगापूर जलवाहिनी 
काम प्रगतीपथावर
कामादरम्यान ड्रीम सिटी चौक ते कृष्णानगर चौक या परिसरातील काही भाग वाहतुकीसाठी बंद राहणार असून, काही भागांमध्ये दुतर्फा वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. टाकळी गाव फाट्याजवळील मार्ग मात्र वाहतुकीसाठी खुला राहील. त्यामुळे वाहनचालकांनी बंद मार्ग टाळून महापालिकेने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या मार्गावरील वाहतूक नियोजन आराखडा खालीलप्रमाणे.
ड्रीम सिटी चौक ते कृष्णानगर चौक परिसरात वाहतुकीत बदल राहतील.
- टाकळी गाव फाटा मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

नकाश्याचे विश्लेषण खालीलप्रमाणे-

- हिरव्या रंगाने दर्शविलेला मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहील.
- लाल रंगाने दर्शविलेला मार्ग तात्पुरता बंद राहील.
- जांभळ्या रंगाने दर्शविलेला मार्ग पर्यायी मार्ग म्हणून वापरण्यात येईल.

"विजय ममता चौक-टाकळी गाव-संगम पूल या महत्त्वाच्या जोडमार्गावरील विविध पायाभूत सुविधा कामे भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन हाती घेण्यात आली आहेत.या मार्गावरील कामांमुळे काही काळ वाहतुकीत बदल अपरिहार्य असले,तरी दीर्घकालीन दृष्टीने नागरिकांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध होतील.नागरिकांनी संयम राखून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि शहराच्या विकास प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करावे."
- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या