नाशिक :- हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे कार्डिओलॉजी व कार्डियाक सर्जरी विभागातर्फे विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.यावेळी हॉस्पिटलमधील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक कार्डियाक टीम उपस्थित होती.या प्रसंगी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर,डॉ.सीमा नक्साने,डॉ. निर्मल कोलते,डॉ.कांचन भांबारे, डॉ.महेश शिवाजी आहिरे, क्लिनिकल कार्डिओलॉजिस्ट डॉ. हेमंतराज आहिरे,कार्डियाक सर्जन डॉ.प्रणव माळी,डॉ.अझर सय्यद (CVTS) तसेच इमर्जन्सी फिजिशियन डॉ. अखिलेश सोमाणी उपस्थित होते.हृदयविकार हा केवळ ज्येष्ठांचा आजार राहिलेला नसून,बदलती जीवनशैली, ताणतणाव,मधुमेह,उच्च रक्तदाब,वाढलेले कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा,धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढत आहे.त्यामुळे लक्षणे दिसण्याची वाट न पाहता नियमित तपासणी करणे आणि जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.डॉ.सुधीर शेतकर यांनी हृदयविकाराचे वेळेवर निदान आणि योग्य उपचारांचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ.सीमा नक्साने यांनी तरुण आणि महिलांमध्ये हृदयविकाराबाबत जागरूकता वाढविण्याची गरज व्यक्त करत लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले.डॉ.निर्मल कोलते यांनी मधुमेह,उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणाचे महत्त्व सांगितले, तर डॉ. कांचन भांबारे यांनी संतुलित आहार,नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीवर भर दिला.डॉ.महेश शिवाजी आहिरे यांनी हृदयविकाराची लक्षणे जाणवल्यास उपचारात विलंब न करण्याचा सल्ला दिला.डॉ. प्रणव माळी यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे जटिल हृदय शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितपणे करता येत असल्याचे सांगितले, तर डॉ.अझर सय्यद यांनी कार्डिओलॉजी,कार्डियाक सर्जरी, क्रिटिकल केअर आणि इमर्जन्सी विभागांमधील उत्तम समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत गोल्डन अवरमध्ये मिळणारी तातडीची वैद्यकीय सेवा अत्यंत महत्त्वाची ठरते.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, क्रिटिकल केअर, अॅनेस्थेशिया यांसह विविध विभागांची मोठी आणि अनुभवी टीम उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करता येतात.विविध तज्ज्ञ एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने उत्तम समन्वयातून सर्व प्रकारच्या क्रिटिकल कार्डियाक केसेस हाताळण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे.जागतिक हृदय दिनानिमित्त ₹१,००० मध्ये ‘Essential Heart Check-up Package’ उपलब्ध असून,त्यामध्ये ECG, 2D Echo, TMT, Lipid Profile, Creatinine, आणि Cardiologist Consultation यांचा समावेश आहे.नागरिकांनी या विशेष पॅकेजचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.३० सप्टेंबरपर्यंत रक्तदाब, रक्तातील साखर आणि ECG तपासणी मोफत करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा धोका वेळेत ओळखण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले.यावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी म्हणाले,“उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी कार्डियाक टीम,अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध तज्ज्ञ विभागांमधील उत्तम समन्वय ही आमची ताकद आहे.गोल्डन अवरमध्ये तातडीचे उपचार आणि सर्व प्रकारच्या क्रिटिकल कार्डियाक केसेस हाताळण्यासाठी आमची टीम सज्ज आहे.नागरिकांनी ₹१,००० मधील हार्ट चेक-अप पॅकेज तसेच ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणीचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”
0 टिप्पण्या