नाशिक :- नाशिक महानगरपालिका व नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये जास्तीत जास्त नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री,यांनी केले आहे.सन २०१५ पासून दि. २१ जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.या वर्षी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार असून नाशिक महानगरपालिका व नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ जून २०२६ रोजी पंचवटी विभागातील भोईर मळा,महादेव कॉलनी पाटालगत,मखमलाबाद रोड येथे सकाळी ६.३० वा.योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये जास्तीत जास्त नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री,यांनी केले आहे.
0 टिप्पण्या