चांदवड - महिंद्रा पिकअप गाडी घेत ठरलेले पैसे न देता फसवणूक;गुन्हा दाखल


चांदवड :- महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी विकत घेतो असे सांगून, ठरलेली रक्कम न देता तसेच गाडीवरील फायनान्सचे हप्ते न भरता एका मजुराची फसवणूक केल्याचा प्रकार चांदवड येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिंद्रा फायनान्सचे कर्ज फेडण्याचे दिले होते आश्वासन पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय भिवन लहाने,(वय ४५ वर्षे, धंदा- मजुरी, रा. मंगरूळ,ता.चांदवड, जि. नाशिक) यांच्या मालकीची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी (क्रमांक MH-15-HH-8425) आहे, जिची अंदाजे किंमत १,००,०००/- रुपये आहे. आरोपी योगेश पंडीत आहेर (रा. रोळसापिंप्री, ता. निफाड, जि. नाशिक) याने ही गाडी विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. तसेच गाडीवर असलेले महिंद्रा फायनान्स कंपनीचे कर्ज स्वतः फेडण्याचे कबूल केले होते.
पैसेही दिले नाहीत अन् गाडीही पळवली या व्यवहाराच्या मोबदल्यात दोन्ही पक्षांमध्ये ४०,०००/- रुपये रोख देण्याचे ठरले होते. मात्र,आरोपीने त्यापैकी ३०,०००/- रुपये फिर्यादीला दिले नाहीत.एवढेच नव्हे तर आरोपीने महिंद्रा फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते भरणेही चुकवले.जेव्हा फिर्यादी संजय लहाने यांनी आपली गाडी परत मागितली,तेव्हा संशयित योगेश आहेर,याने गाडी परत करण्यास स्पष्ट नकार दिला.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आपली फसवणूक व वाहनाची अफरातफर झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने चांदवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी संशयित योगेश पंडीत आहेर,याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.अद्याप संशयित अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवादार ए. जो. शिरसाठ करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या