त्र्यंबकेश्वर (नाशिक):- रस्ता चुकल्यामुळे चौकशी करणाऱ्या फिर्यादी आणि त्यांच्या साथीदाराला अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सुंदरवाडी रोडवर घडली आहे.या हल्ल्यात एका साक्षीदाराच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी शिवानंद सतिश तिवारी (वय २५, व्यवसाय- पूजा पाठ, रा.फ्लॅट नं. १०३, गणेशा प्राईड,तारवाला नगर, लमखेडे मळा, पंचवटी, नाशिक) हे त्यांच्या साथीदारासह (साक्षीदार) प्रवासादरम्यान रस्ता चुकले होते. ४ जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास ते सुंदरवाडी रोडने परत येत होते.
त्याच वेळी प्रकाश गमे,आणि त्यांचा भाऊ सुनील गमे, (दोघे रा. सुंदरवाडी, त्र्यंबकेश्वर) यांनी त्यांना रस्त्यात अडवले."माझी मुलगी कुठे आहे?"अशी विचारणा करत आरोपींनी फिर्यादी व साक्षीदाराला विनाकारण अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दगड आणि काठीने प्राणघातक हल्ला विवादाचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत झाले.आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या सोबत असलेल्या साक्षीदाराच्या डोक्यात मोठा दगड मारला.यामुळे साक्षीदार गंभीर जखमी झाला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांना काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.पोलीसांत गुन्हा दाखल
या घटनेनंतर फिर्यादी शिवानंद तिवारी यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलीसांनी प्रकाश गमे, आणि सुनील गमे,यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७७/२६ नुसार, नवीन कायद्यातील बीएनएस (BNS) कलम १०९, ११५(२), ३५२, आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) खैरनार करत आहेत.
0 टिप्पण्या