सटाणा :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची गुपचूप विक्री करणाऱ्या सटाण्यातील एका प्रोव्हीजन स्टोअर्सवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सटाणा शहरातील गणेश नगर भागात असलेल्या'योगेश्वर प्रोव्हीजन स्टोअर्स'मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी, १२ मे २०२४ रोजी सकाळी ११:३६ च्या सुमारास पोलिसांनी या दुकानात छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांना किराणा मालाच्या आड लपवून ठेवलेला ३५२ रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पान मसाला आणि ८८ रुपये किमतीची व्ही-१ तंबाखू असा एकूण ४४० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.महाराष्ट्र शासनाने विक्रीस बंदी घातलेला हा माल विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी जिवन शंकर सोनवणे,(वय ३६, रा.गणेश नगर, सटाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सटाणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३, २७४ आणि २७५ अन्वये हा गुन्हा (क्र. ३१३/२०२४) नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस शिपाई उमाकांत एकनाथ बच्छाव यांनी केली असून,या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार व्ही पी जाधव,करत आहेत.
0 टिप्पण्या