नाशिक :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेतर्फे आयोजित बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या देशी बियाण्यांसोबतच्या“बीजतुला”, मधमाशी संवर्धन केंद्राचे लोकार्पण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या की,देशी बियाण्यांचे संवर्धन,जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरण संरक्षणासाठी राहीबाई पोपेरे यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करताना पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास महापौर हिमगौरी आहेर आडके,भाजप महानगर अध्यक्ष सुनील केदार,जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,कुंभमंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे ओएसडी संदीप जाधव,प्रभाग सभापती समाधान देवरे,भाजप गटनेते श्याम बडोदे,नगरसेवक सुरेश आण्णा पाटील,सुनील खोडे,रोहिणी पिंगळे,नगरसेविका प्रियंका माने,
डॉ.तुकाराम निकम,राजेश पंडित,मनोज साठे,नाना शिलेदार,आदींसह उपस्थित होते.
0 टिप्पण्या