शेतकऱ्याची ७० हजार रुपयांची दुचाकी लंपास;अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल



कळवण तालुक्यातील गोबापूर शिवारातून शेतकऱ्याची ७० हजार रुपयांची दुचाकी लंपास;अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

कळवण (नाशिक):- चोरीच्या घटनेबाबत हकीकत अशी की शेतातील आंब्याच्या झाडाखाली उभी केलेली ७० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना कळवण तालुक्यातील गोबापूर शिवारात घडली आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कैलास सुभाष गवळी,(वय ३८,रा.आठंबे शिवार,ता.कळवण) हे शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.६ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० वाजेच्या दरम्यान त्यांनी आपली काळ्या रंगाची 'होंडा शाईन' मोटारसायकल (क्रमांक: MH-41-BW-6365) गोबापूर शिवारातील शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उभी केली होती.हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय सदर दुचाकी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
दुचाकी चोरीला गेल्यानंतर फिर्यादी कैलास गवळी,यांनी स्वतःच्या पातळीवर सर्वत्र शोध घेतला.मात्र, दुचाकीचा कुठेही पत्ता न लागल्याने त्यांनी अखेर ९ जून २०२६ रोजी कळवण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बागुल,करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या