मंत्री गिरीश महाजन,महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या उपस्थितीत उद्या कपिला नदी महा-स्वच्छता अभियान


नाशिक :- उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक महानगर पालिकेच्या वतीने उद्या रविवार दि.२८ जून २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत 'कपिला नदी स्वच्छता अभियान"आयोजित करण्यात आलेले आहे.या अभियानास कुंभमंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.पर्यावरण संवर्धनामध्ये नद्या,जलस्रोत व नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब असून त्या अनुषंगाने उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिका (NMC) आणि नाशिक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ (NTMKA) यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या'कपिला नदी स्वच्छता अभियान"यामध्ये जलसंपदा,कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, यांची प्रमुख उपस्थिती सह महापौर हिमगौरी आहेर-आडके,उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे गटनेते पदाधिकारी,नगरसेवक,
लोकप्रतिनिधी,अधिकारी,विविध शासकीय विभागांचे अधिकारी/कर्मचारी, स्वयंसेवी संस्था,शैक्षणिक संस्था,पर्यावरणप्रेमी नागरिक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.तरी आपण सर्वांनी कपिला नदीसाठी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
कपिला नदी स्वच्छता अभियानाचे स्थळ
१)के. के. वाघ कृषी महाविद्यालय, सरस्वती नगर (प्रभाग क्र.३)
२)साई नगर (प्रभाग क्र. ३)
३)जनार्दन स्वामी मठ (प्रभाग क्र. ३)वृक्षारोपण (सकाळी ८:३० वाजता)सदाशिव गंगाराम भोरे नाट्यगृहा जवळ, कमल नगर, हिरावाडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या