#SinnarNews #SinnarPolice #CrimeNews #NashikCrime #SinnarCrime #BreakingNews #SinnarUpdate #GaneshPeth #NashikNews #ChoriNews #MarathiNews #SinnarMarket
गणेश पेठेत कापड दुकानाच्या ओट्यावरून हजारो रुपयांचा माल लंपास; सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल(सिन्नर प्रतिनिधी)
सिन्नर :- शहरातील गणेश पेठ भागात असलेल्या एका कापड दुकानाच्या ओट्यावरून अज्ञात चोरट्याने सुमारे ४३ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,गणेश पेठ येथील‘कासट टेक्स्टाईल मार्केट’ या कापड दुकानाच्या मोरील ओट्यावरून ही चोरी झाली. चोरट्याने ओट्यावर ठेवलेल्या ओसवाल कंपनीच्या ३५ नवीन शॉल (किंमत १५,७५० रुपये) आणि हिरव्या रंगाचे १५० नग ब्लाऊज पीस (किंमत २,१०० रुपये) असा एकूण १७,८५० रुपयांचा माल चोरून नेला.
ही घटना २० मे २०२६ रोजी सकाळी ८:२० ते १०:०० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुकानाचे मालक वैभव श्रीनिवास कासट (वय ५१, रा. शिवाजीनगर, सिन्नर) यांनी २१ मे रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
साक्षीदाराचाही माल चोरीला
या घटनेत केवळ फिर्यादी कासट यांचाच नाही, तर कापड मार्केटमधील साक्षीदार तेजस उदय नाईक (रा. गणेश पेठ, सिन्नर) यांचाही २५,१७३ रुपये किमतीचा माल या अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. एकूण चोरीचा आकडा ४३ हजार रुपयांच्या पुढे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बोराडे,करत आहेत.
0 टिप्पण्या