कन्यादान योजनेंतर्गत सामूहिक सोहळ्यात विवाह केल्यास अनुसूचित जातीच्या दांम्पत्यास अनुदान

कन्यादान योजनेंतर्गत सामूहिक सोहळ्यात विवाह केल्यास अनुसूचित जातीच्या दांम्पत्यास २५ हजार रुपयांचे अनुदान

नाशिक :- कन्यादान योजनेंतर्गत सामूहिक सोहळ्यात विवाह केल्यास अनुसूचित जातीच्या दांम्पत्यास २५ हजार रुपयांचे अनुदान आणि सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे ४ हजार रुपयांचे अनुदान मिळू शकते, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. 

योजनेचे स्वरुप असे : विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे व त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी राज्यातील अनुसुचित जाती,नवबौध्द कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान व सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्यांमागे 4 हजार रुपये अनुदान देण्यात येते.पात्रता निकष : वधू व वर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी (Domcile)असावेत.नव दाम्पत्यातील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण अनुसुचित जाती,नवबौध्द प्रवर्गातील असावेत. दांम्पत्यापैकी वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये. वधू व वराच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय असेल. तसेच या योजनेचा लाभ विधवा महिलेस दुस-या विवाहाकरीता देखील अनुज्ञेय राहील. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन दांम्पत्य/कुटुंब यांच्याकडून झालेले नसावे. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणे आवश्यक आहे.जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले असावे.

स्वंययेवी संस्थेसाठी निकष : सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणारी स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी.तसेच अर्ज सादर करताना सदर नोंदणी प्रभावी असली पाहिजे. सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणारी स्वयंसेवी संस्थेने सहभागी होत असलेल्या अनुसुचित जाती,नवबौध्द,प्रवर्गातील वधू व वराच्या कागदपत्रांसह विवाह संपन्न होण्याच्या किमान 30 दिवस अगोदर सहायक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालय (नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर ,नाशिक पुणे रोड) येथे संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी