अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातीलबचतगटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्थसाहाय
नाशिक :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना अनुदानावर ट्रॅक्टरसह साधने खरेदीसाठी अर्थसाहाय देण्यात येते. या योजनेचा पात्र स्वयंसेवी बचत गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
योजनेचे स्वरूप असे : या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर व ट्रेलर) यांचा पुरवठा करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेत (90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा) खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल.
पात्रतेचे निकष : 1.स्वयंसहाय्यता बचत गटांचे सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवाशी (Domcile) असावेत.2. स्वयंसहाय्यता बचत गटांतील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. 3. स्वयंसहाय्यता बचत गटांतील अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.4. मिनी ट्रॅक्टर व त्याच्य उपसाधनांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.50 लाख रुपये राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या 90 टक्के (कमाल रु. 3.15लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.अर्ज करावयाची अंतिम मुदत : या योजनेच्या लाभासाठी इच्छुक पात्र बचतगटांनी योजनेशी निगडित कागदपत्रे, विहित नमुन्यातील लेखी अर्ज व परिपूर्ण प्रस्ताव 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यत सादर करावा.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण,नाशिक,सामाजिक न्याय भवन, बी-विंग, दुसरा मजला,नासर्डी पुलाजवळ,नाशिक - पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा