नाशिक :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद, स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार या निवडणुकीची आदर्श आचार संहिता संपूर्ण नाशिक जिल्ह्यात 18 मे 2026 पासून लागू झाली आहे.त्याअनुषंगाने 1 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक येथे होणारा जिल्हा लोकशाही दिन होणार नाही याची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी,असे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0 टिप्पण्या