प्रभाग २३ मध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

इंदिरानगर :- वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' हा संत तुकारामांचा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणत,प्रभाग क्रमांक 23  दीपाली नगर येथील 'रचित कल्पवृक्ष' सोसायटीमध्ये वृक्षारोपण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.राज्याचे जलसंपदा, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'उन्नत नासिक अभियाना'अंतर्गत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेवक व पूर्व प्रभाग समिती सभापती मंगला ननावरे,नगरसेविका रुपाली निकुळे,माजी नगरसेवक यशवंत निकुळे शहर सरचिटणीस सुनील देसाई,मंडळ अध्यक्ष उदय जोशी,सर्बिद शिंग दया,डॉ राजेंद्र भंडारी,शर्मिला साळी उपस्थित होते.त्यांनी उपस्थित नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत,"केवळ झाडे लावणे पुरेसे नसून,त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे,"असे मोलाचे मार्गदर्शन केले.

केवळ वृक्षारोपण करून न थांबता,त्यांचे जतन करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.प्रभागाच्या नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली 'रचित कल्पवृक्ष' येथील रहिवासी चेअरमन अरुण पाटील,प्रसाद पवार,मिलिंद फड,केतन सूर्यवंशी,राकेश जाधव,सुहास खंडारे,श्रीपाद बरबडे, यतीन अहिरराव, बिरारी मॅडम आणि सौरभ देशपांडे यांनी वड, पिंपळ, कडू लिंब यांसारखी पर्यावरणाला पूरक असणारी मोठी झाडे दत्तक घेतली. तसेच,या झाडांचे पूर्ण जबाबदारीने संगोपन करण्याचा संकल्पही त्यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रचित कल्पवृक्षचे अध्यक्ष अरुण काका पाटील, खजिनदार किरण कोळपे, आणि सचिव मिलिंद फड, यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी देवरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणाच्या कामात मोलाचे तांत्रिक सहकार्य केले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभागातील महिला व पुरुष सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.यात प्रामुख्याने
योगेश कोपरे,संजय सोनावणे,किरण कोळपे,अजय सोनार,सुबोध गांगुर्डे, अभिजीत झाल्टे,सुरेंद्र हिरे,राठोड साहेब, ज्ञानेश्वर आवारे,निमसे सर,रमेश वाडेकर,मनीष काबरा आणि विशाल बोरसे. सुनंदा पाटील,सूचित फड, सौ. कासार, सौ.बोरसे, सौ. शहाणे, सौ. बोके, सौ.अहिरराव आणि सौ.नीती पाटील यांचा समावेश होता.रचित कल्पवृक्ष' सोसायटीने राबवलेल्या या वृक्ष दत्तक योजनेचे आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या