Breaking news,crime news,Nashik crime news,Nashik rural police
ओझर (प्रतिनिधी) :- निफाड तालुक्यातील ओझर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, चक्क एका पत्रकाराची दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. जनशांती धामच्या मागील बाजूला असलेल्या पार्किंगमधून ही चोरी झाली असून,याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी (नाशिक) येथील रहिवासी असलेले पत्रकार मुकुंद तात्या पिंगळे (३६) हे गुरुवारी (दि. १४) कामानिमित्त ओझर येथे आले होते. रात्री ९:३० ते ११ च्या सुमारास त्यांनी आपली होंडा शाइन मोटरसायकल (क्रमांक: MH 15 FG 4955) जनशांती धामच्या गेट नंबर २ समोरील पार्किंगमध्ये उभी केली होती.काही वेळाने परतल्यानंतर त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही.अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने सुमारे ३० हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात येताच पिंगळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.याप्रकरणी ओझर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १०१/२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बागुल (ब.नं. १११३) करत आहेत.दरम्यान, या चोरीच्या घटनेमुळे ओझर परिसरात वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून,पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.चोरीला गेलेल्या गाडीचा तपशील:
गाडी: होंडा शाइन (जुनी वापरती)
क्रमांक: MH 15 FG 4955
इंजिन नंबर: JC 65 ET 0286494
चेसिस नंबर: ME4 JC 652 BGT 092778
0 टिप्पण्या