(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- पाण्याची पाईप लाईनची जोडणी करणे करीता विना परवानगी नवीन डांबरीकरण झालेला रस्ता फोडल्या प्रकरणी मनपा बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाईची नोटीस संबंधित प्लंबरला देण्यात आली असून दंड न भरल्यास नियमानुसार गुन्हा दाखल करणे येईल असे त्या नोटिस मध्ये नमूद केले आहे.
सातपुर विभागातील प्र. क्र. ०९ मधील माऊलीनगर, साईसिटी पार्क या परिसरातील नवीन डांबरीकरण झालेला रस्ता फोडुन पाण्याची पाईप लाईनची जोडणी करणे करीता रस्ता क्रॉस करुन पाण्याचे पाईप टाकल्याचे मनपा बांधकाम विभागाच्या निदर्शनास आले आहे. हे काम मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता केले आहे. त्याप्रकरणी प्लंबर राजेंद्र कोंडू मंडळ, रा.श्रमिकनगर, सातपूर, नाशिक यास त्यापोटी रोड डॅमेज चार्जेस आकार १०.०० मी x १५७७.०० = १५७७०/- आणी विना परवानगी रस्ता फोडले बाबत २०% दंड आकारणी र.रू. ३१५४/- अशी एकूण र.रू. १८,९२४/- (अक्षरी रक्कम रूपये अठरा हजार नऊशे चोवीस मात्र) मनपा खजिण्यात भरावी अन्यथा नियमानुसार गुन्हा दाखल करणे येईल अश्या स्वरूपाची नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्या वतीने देण्यात आली आहे.
विना परवानगी रस्ता फोडल्यास दंडात्मक कारवाई पाणीपुरवठा,भुयारी गटार,विद्युत आदी बाबतचे काम करण्यासाठी विनापरवाना रस्ता तोडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती अधीक्षक अभियंता (पा.पु.)तथा प्र.शहर अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या