सटाणा-अजमेर रोडवर दुचाकींचा भीषण अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी
Breaking news latest news Maharashtra news nashik News Satana News crime news
सटाणा-अजमेर सौंदाणे रस्त्यावरील दूधमाळ वस्तीजवळ दोन मोटार सायकलींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून,दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबूलाल चिंधा पवार (वय ७६, रा. देवळाणे) हे त्यांच्या पत्नी शकुंतलाबाई यांच्यासह टीव्हीएस लुना (क्र. MH-41 AL-9640) वरून सटाणा-अजमेर सौंदाणे रस्त्याने जात होते. सायंकाळी ४:३० च्या सुमारास दूधमाळ वस्तीजवळ समोरून येणाऱ्या मोटार सायकलने (क्र. MH-41 BY-2488) त्यांना जोरदार धडक दिली.आरोपीत रवींद्र तुळशीराम पवार (रा. देवळाणे) याने आपली मोटार सायकल भरधाव वेगाने आणि हयगयीने चालवून पवार यांच्या लुनाला समोरून धडक दिली. या अपघातात बाबूलाल पवार व त्यांच्या पत्नीच्या उजव्या पायाला, हाताला, छातीला व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सटाणा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(a), १२५(b), ३२४(४) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार देवरे (ब.नं. २१७८) करित आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा