मालेगाव (प्रतिनिधी):- मालेगाव येथील आयशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादातून एका तरुणावर आणि त्याच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने केलेल्या या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून,पोलिसांनी याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जमीरूद्दीन मोईनुद्दीन कुरेशी यांच्या पत्नी आफरिन या घराजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ कचरा टाकण्यासाठी गेल्या होत्या. तिथे राहणाऱ्या त्यांच्या वहिणीच्या सासूशी (हिवरा) त्यांचा शाब्दिक वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादींचा भाऊ समीर हा मध्यस्थी करायला गेला असता,आरोपीतांनी त्याच्यावर हल्ला चढवला.फिर्यादीचा मेहुणा सैय्यद जुबेर सिराज अली,त्याचे दोन भाऊ आणि वडिलांनी संगनमत करून समीरला जिवे मारण्याच्या उद्देशाने घेरले.आरोपींनी लाकडी दांडके,लोखंडी पाईप आणि कोपऱ्याने समीरच्या डोक्यावर,छातीवर, पोटावर आणि पाठीवर गंभीर वार केले. इतकेच नव्हे तर फिर्यादींच्या पत्नीलाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, आयशानगर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत खालील चार आरोपीतांना अटक केली आहे:
१) सैय्यद जुबेर सिराज अली (२६ वर्ष)
२) अनीम उर्फ शादाब सिराज अली (२० वर्ष)
३) अबरार सैय्यद सिराज अली (१८ वर्ष)
४) सैय्यद सिराज अली (५६ वर्ष)
२) अनीम उर्फ शादाब सिराज अली (२० वर्ष)
३) अबरार सैय्यद सिराज अली (१८ वर्ष)
४) सैय्यद सिराज अली (५६ वर्ष)
गुन्ह्याची नोंद
याप्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०९ (१), ११० (२), आणि ३ (५) अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि एस.जी. पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
याप्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०९ (१), ११० (२), आणि ३ (५) अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि एस.जी. पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
0 टिप्पण्या