महापौर दालनात इलेक्ट्रिक सबस्टेशन बाबत महत्वाची बैठक

नाशिक :- प्रभाग क्रमांक १३,जुने नाशिक येथील मातंगवाडा परिसरातील मनपाच्या खुल्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या एमएसईबी इलेक्ट्रिक सबस्टेशन संदर्भात स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्र आणि डेव्हलपमेंट प्लॅन सादर करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.याच अनुषंगाने एमएसईबीचे अधिकारी सर्व कागदपत्र डेव्हलपमेंट प्लॅन घेऊन महापौर दालनात बैठकीसाठी आले होते.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत असे महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सांगितले.यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे, नगरसेविका मयुरीताई पवार,अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,उपायुक्त सामान्य प्रशासन लक्ष्मीकांत सातळकर,सामाजिक कार्यकर्ते अंकुश पवार आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या