नाशिकमध्ये ३१ मे रोजी ‘शिवगोरक्ष योगपीठ’तर्फे मोफत अ‍ॅक्युपंक्चर उपचार शिबिराचे आयोजन

नाशिक :- शिवगोरक्ष योगपीठ, नाशिक यांच्या वतीने येत्या ३१ मे रोजी एका विशेष मोफत अ‍ॅक्युपंक्चर तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. "स्वास्थ्य, साधना आणि समाधान" हे ब्रीदवाक्य घेऊन होणाऱ्या या शिबिरात रुग्णांना औषधांविना नैसर्गिक उपचारांचा लाभ घेता येणार आहे.या आजारांवर होणार उपचार शिबिरामध्ये प्रामुख्याने पाठदुखी, कंबरदुखी, मान व खांदेदुखी, गुडघेदुखी, सायटिका, मायग्रेन आणि डोकेदुखी यांसारख्या त्रासांवर तज्ज्ञांद्वारे विशेष मार्गदर्शन व उपचार केले जातील. याशिवाय स्ट्रेस (तणाव), अनिद्रा, पीसीओडी (PCOD), वजन नियंत्रण, लकवा, नसांचे विकार आणि अ‍ॅसिडिटी किंवा पचनाच्या समस्यांवरही येथे वैद्यकीय सल्ला दिला जाईल.
शिबिराची वैशिष्ट्ये:
या शिबिरात अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून ते रुग्णांना वैद्यकीय सल्ला व सुरक्षित उपचार पद्धती सुचवणार आहेत. उपचारांसोबतच रुग्णांना उत्तम आरोग्यासाठी योग, योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीचे मार्गदर्शनही केले जाईल.
नावनोंदणी कशी करावी?
शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. रुग्णांनी ८८८८८३२२९४ या क्रमांकावर SMS द्वारे आपली नोंदणी करावी. SMS मध्ये आपले नाव,वय,आजार किंवा समस्या आणि स्वतःचा संपर्क क्रमांक लिहून पाठवावा.शिबिराचा सविस्तर तपशील: दिनांक: ३१ मे २०२६ वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत ठिकाण: शिवगोरक्ष योगपीठ,नाशिक संपर्क: ८८८८८३२२९४
आयोजकांनी नाशिक आणि परिसरातील नागरिकांना या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन ककेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या