नाशिक :- इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथून एक जुनी बजाज पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्याद दगडू धोंडू रोंगटे (वय ४७, व्यवसाय: शिक्षक, रा. साकूर, ता. इगतपुरी, ह.मु. कोणार्क नगर, आडगाव शिवार,नाशिक यांनी दाखल केली आहे.
चोरीचा माल: १५,००० रुपये किमतीची लाल रंगाची पट्टे असलेली जुनी बजाज पल्सर (१५० सीसी),गाडी क्रमांक MH 15-GD-9228.गाडीवर समोरच्या विझरवर 'ओम'चे स्टिकर आणि उजव्या बाजूला लेदर बॅग लावलेली आहे.सदरची घटना दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी किंवा त्याआधी घडलेलीआहे.फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाडीवरे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक लहामटे करत आहेत.
0 टिप्पण्या