जाहीर प्रकटन
नाशिक महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या “रामकाल पथ” प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीकाठावरील घाट परिसराचे सुशोभीकरण आणि विकासाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी १६ मे ते १६ जुलै या कालावधीत घाट परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशावर आणि हालचालीवर तात्पुरती बंदी घालण्याबाबतचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर,घाट विकासाबाबतचे सादरीकरण करण्यात आले. दि. १५/०५/२०२६ रोजी मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि पुरोहित महासंघाचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार खालील बाबींवर सहमती झाली आहे:१. दशक्रिया आणि इतर विधी: हे विधी यशवंत महाराज पटांगण व भाजी बाजार पटांगण येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शेडमध्ये पार पाडले जातील.२. पिंडदान व स्नान: नागरिकांना पिंडदान आणि स्नानासाठी गांधी तलावाचा वापर करता येईल.३. अस्थि विसर्जन: अस्थि विसर्जनासाठी 'अस्थि कुंड' उपलब्ध असेल.कामाच्या नियोजनासाठी आणि सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे,अशी विनंती करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या