मनपा प्रशासनाने बैठक आयोजित करून ऐनवेळी रद्द केल्याने प्रहार दिव्यांग संघटना पदाधिकारी संतप्त


(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- शहरातील दिव्यांगांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच राखीव आणि निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते त्या पत्रास अनुसरून नाशिक महानगरपालिकेने दिनांक 11 मे रोजी अकरा वाजता बैठक आयोजित केली असल्याचे लेखी पत्र पाठवून बैठकीस आमंत्रित केले होते. जेव्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे आले असता बैठक रद्द झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले तसेच अतिरिक्त आयुक्त व मनपा उपायुक्त समाज कल्याण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आयोगाच्या बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले दिव्यांग संघटनेची बैठक ही पूर्वनियोजित असतानाही मनपा अधिकारी हे हजर नसल्याने दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मनपा दिव्यांग निधी मधून दिव्यांगांना दरमहा 3000 ऐवजी 6000 रुपये अनुदान देण्यात यावे तसेच राखीव दिव्यांग निधी इतरत्र न वळवता तो दिव्यांगांसाठीच खर्च करण्यात याव्या आदी मागण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांगांकडे महानगरपालिकेचा बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक स्वरूपाचा असल्याची खंत दिव्यांगांनी व्यक्त केली दिव्यांगांच्या मागण्या येत्या 15 दिवसात मान्य न झाल्यास मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा, हाॅकर्स झोन चे अध्यक्ष वसंत ठाकुर,मुकबधिर जिल्हाध्यक्ष शोहेब सिद्दीकी,उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी,शहराध्यक्ष सुभाष निकाळजे,जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कांगणे, उपशहरप्रमुख दिपक भोई आदी सह दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी