जिल्हा अभिलेखावरील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला मालेगावमधील सराईत गुन्हेगार अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले आरोपी, फरार आरोपी, हिस्ट्रीशीटर, गँग हिस्ट्रीशीटर, तडीपार गुन्हेगार यांच्या सध्याच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय माहिती घेऊन त्यांच्यावर सत्वर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस.स्वामी यांनी दिलेले आहेत.त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय अभिलेखावरील आरोपींवर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार मालेगाव शहरात गुन्हेगार चेकिंग करत असताना, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्हा अभिलेखावरील विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अकबर चोरवा हा नवीन बसस्थानक परिसरात आलेला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने नवीन बसस्थानक परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार नाव अकबर खान हबीब खान उर्फ अकबर चोरवा (वय ४०, रा. सर्व्हे नं. १११, प्लॉट नं. २९२, किस्मत सायझिंग जवळ, मालेगाव) यास ताब्यात घेतले आहे. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने खालीलप्रमाणे गुन्हे केल्याबाबत कबुली दिली आहे:
१) पवारवाडी पो.स्टे. गु.र.नं. २०५/२०२४, भा.न्या.सं. कलम ११८(२), १८९(२), १९१(२), १९२(२), १९०.
२) मालेगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ८४/२०२५, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(अ).
३) येवला शहर पो.स्टे. गु.र.नं. ३८८/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(४), ३२४(४), ३(५).
४) जिल्हा पेठ पो.स्टे., जि. जळगाव गु.र.नं. १०४/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५.
२) मालेगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ८४/२०२५, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(अ).
३) येवला शहर पो.स्टे. गु.र.नं. ३८८/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५, ३३१(४), ३२४(४), ३(५).
४) जिल्हा पेठ पो.स्टे., जि. जळगाव गु.र.नं. १०४/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५.
यातील आरोपी अकबर चोरवा हा मालेगाव शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वरील प्रमाणे चोरी,घरफोडी, दरोडा यांसारखे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस पवारवाडी पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मालमत्तेविरुद्धचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी,अपर पोलीस अधीक्षक मालेगाव सूरज गुंजाळ, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोउपनि सुदर्शन बोडके, पोउपनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दत्ता माळी, आबा पिसाळ, कैलास मानकर, बालाजी कुंटेवाड, तांत्रिक विभागाचे पोहवा हेमंत गिल्बिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा