नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या उपक्रमांचे मोलाचे योगदान न्यूज लेटरचे प्रकाशन


(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
 नाशिक :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिक मनपा शाळांमध्ये राबविले जाणारे विविध उपक्रमांचे सर्व समावेशक असे मोलाचे योगदान न्यूज लेटरचे प्रकाशन मनपा पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित न्यूज लेटरचे प्रकाशन नुकतेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश मनपा शाळांमध्येच करावा,असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
या न्यूज लेटरचे प्रकाशन नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते करण्यात आले. उपमहापौर विलास शिंदे ,पूर्व प्रभाग सभापती मंगला नन्नावरे, नगरसेविका रुपालीताई निकुळे तसेच मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडला.
महानगरपालिका शाळांमध्ये मागील वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना प्रोत्साहन देणारे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले आहेत.न्यूज लेटरमध्ये खालील महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे:
१) स्मार्ट स्कुल (Smart School): आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल वर्ग खोल्यांची निर्मिती.
 २)जिज्ञासा प्रकल्प: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल निर्माण करणे.
३)इस्त्रो सहल (ISRO Tour): विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय वैज्ञानिक संस्थांची व अंतराळ संशोधनाची ओळख करून देणे.
४)निपुण महाराष्ट्र उपक्रम: मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीस प्रोत्साहन.
५)माजी विद्यार्थी मेळावा
६)दिव्यांग विद्यार्थी क्रीडा स्पर्धा:सर्वसमावेशक शिक्षणाचा प्रसार
७)हरित कुंभ: पर्यावरण संवर्धन व जागरुकता निर्माण करणारे उपक्रम.

महापौर हिमगौरी आहेर आडके
"नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विविध उपक्रम आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश मनपा शाळांमध्येच करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करावे."

प्रशासनाधिकारी,मनपा शिक्षण विभाग डॉ. मिता चौधरी
 "नाशिक महानगरपालिका शाळा गुणवत्ता आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणासाठी मनपा शाळांमध्ये प्रवेश घ्यावा."

हे न्यूज लेटर नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री व अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या प्रेरणेने आणि मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या मार्गदर्शाखाली शिक्षण विभागाने तयार केले आहे. तसेच, हे न्यूज लेटर तयार करण्यासाठी विशेष शिक्षक प्रल्हाद हंकारे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

डॉ. मिता चौधरी 
प्रशासन अधिकारी 
मनपा शिक्षण विभाग नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी