नाशिक महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडणूक संपन्न


नाशिक :-  महानगरपालिकेच्या ६ प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणुक विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी मा.विभागीय अप्पर आयुक्त अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालय स्थायी समिती सभागृहात पार पडली असल्याची माहिती नगरसचिव संजय नेरकर यांनी दिली. 
या प्रभाग समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी
पूर्व विभाग प्रभाग सभापती पदासाठी 
१)मंगला प्रकाश नन्नावरे २)अत्तार नाझिया जाकीर 
यांनी अर्ज दाखल केले होते त्यात अत्तार नाझिया जाकीर यांनी माघार घेतली असल्याने यामध्ये एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने पूर्व प्रभाग सभापती पदी मंगला प्रकाश नन्नावरे या निवडून आल्याची घोषणा विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी विभागीय अप्पर आयुक्त अजय मोरे यांनी केली. 
पश्चिम विभाग
 १)पाटील सुरेश आण्णाजी
पंचवटी विभाग-
१) पिंगळे रोहिणी बापूराव

नवीन नाशिक विभाग-
१)बाळकृष्ण चंद्रभान शिरसाठ 

सातपूर विभाग- 
१)समाधान नामदेव देवरे 
यांचे एकमेव अर्ज असल्याने या विभागातील प्रभाग सभापती म्हणून निवडून आल्याची घोषणा मा.विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी मा.विभागीय अप्पर आयुक्त अजय मोरे यांनी केली.
नाशिकरोड विभाग- 
१)मैंद प्रमिला कैलास 
२)धोंगडे रमेश शंकर 
यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात मैंद प्रमिला कैलास यांनी माघार घेतली असल्याने यामध्ये एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने नाशिकरोड प्रभाग सभापती पदी धोंगडे रमेश शंकर हे निवडून आल्याची घोषणा विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी विभागीय अप्पर आयुक्त अजय मोरे यांनी केली.प्रभाग सभापतींची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार महापौर हिमगौरी आहेर आडके,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,तसेच मनपातील गटनेते, पदाधिकारी व नगरसेवक यांनी केला असल्याची माहिती नगरसचिव संजय नेरकर यांनी दिली.प्रभाग सभापती निवडणूक पार पाडण्यासाठी नगरसचिव संजय नेरकर,सहाय्यक नगरसचिव मुकेश बैरागी,किशोर कोठावळे,राजू वर्मा,अजय शिरसाठ,सचिन निगळ,यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी