हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे लाखोंचा साठा नष्ट

India Maharashtra crime news Nashik crime news breaking news latest news

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- वडानेर खाकुर्डी परिसरात अवैध हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात डोंगर-दऱ्यांमध्ये तसेच नदी,नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणी छुप्यारित्या सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर सत्वर कारवाई करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पथकाला आदेश दिलेले आहेत.त्यानुसार दि. २९/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने वडानेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत काष्टी गावच्या शिवारात मोसम नदीच्या किनारी काटेरी झाडाझुडपांमध्ये अवैधित्या सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केलेली आहे.सदर छाप्यामध्ये हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे नवसागर मिश्रित रसायन व साहित्य साधने असा एकूण २,०२,०००/- (दोन लाख दोन हजार) रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. सदर छापा कारवाईत १) विष्णू अशोक सोनवणे आणि २) केदा तुळशीराम गायकवाड (दोन्ही रा. काष्टी, ता. मालेगाव) यांनी पोलिसांची चाहूल लागताच पलायन केले.सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीररित्या हातभट्टी लावून गावठी दारू करताना मिळून आले असून,त्यांच्याविरुद्ध वडानेर खाकुर्डी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(फ)(ई) प्रमाणे ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अतिदुर्गम भागात हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दूषित पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक असणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचे गावठी दारू हातभट्टीचे अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलिसांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक  दत्तात्रय शिंदे, पोउपनि दत्ता कांभिरे,पोहवा सुभाष चोपडा,दत्ता माळी यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी