जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माहितीपुस्तकाचे अनावरण संपन्न


नाशिक :- महानगरपालिकेमार्फत शहरातील स्वच्छता व शाश्वत कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी “स्वच्छ भारत अभियान”अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कचरा वर्गीकरण व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम याबाबत सविस्तर माहिती देणारे माहितीपुस्तक तयार करण्यात आले आहे.
जागतिक वसुंधरा दिन निमित्ताने या माहितीपुस्तकाचे अनावरण महापौर हिमगौरी आडके,उपमहापौर विलास शिंदे तसेच स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या हस्ते करण्यात आले.जनजागृती उपक्रम मनपा आयुक्त मनिषा खत्री तसेच अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून सदर माहितीपुस्तक Centre for Science and Environment (सीएसई), नवी दिल्ली या संस्थेमार्फत जनजागृतीकामी उपलब्ध करून देण्यात आले आहे.या माहिती पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकांना घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे,ओल्या कचऱ्यावर स्थानिक पातळीवर कंपोस्टिंग प्रक्रिया राबविणे, तसेच सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व व्यवस्थापन केल्यास पर्यावरणीय प्रदूषणात घट होऊन स्वच्छता,आरोग्य व शाश्वत विकास साध्य होण्यास मदत होते,यावर भर देण्यात आला आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचरा जाळणे किंवा लागू नियमांचे उल्लंघन करणे यासंदर्भात दंडात्मक तरतुदी असल्याची माहिती या माहितीपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन करण्यात आले.सदर माहितीपुस्तक शहरातील घरोघरी प्रत्यक्ष तसेच डिजिटल माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.यावेळी नगरसेवक दिनकर पाटील,जयंत जाचक,सविता काळे,कोमल मेहरोलिया, निवृत्ती इंगोले, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.आवेश पलोड,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,CSE संस्थेचे प्रतिनिधी कैफी,अदिती पताडे तसेच पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.नाशिक महानगरपालिका सर्व नागरिक,संस्था व आस्थापनांना आवाहन करते की,“स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक”या ध्येयपूर्तीसाठी कचरा वर्गीकरण व शाश्वत व्यवस्थापनाची जबाबदारी सामूहिकरित्या पार पाडावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी