मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आढावा बैठक संपन्न



नाशिक :- महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्याचा सखोल आढावा घेण्यासाठी दि.२१ रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत जिह्यातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

या बैठकीत विशेषतः जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांच्या पटसंख्येत वाढ होण्यावर भर देण्यात आला.येणाऱ्या काळात अधिकाधिक विद्यार्थी या शाळांकडे आकर्षित होतील,यासाठी प्रत्येक शाळेचा सुस्पष्ट आणि दर्जेदार आराखडा तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.शाळा केवळ इमारतीपुरत्या मर्यादित न राहता त्या सुरक्षित,सुसज्ज आणि सर्व आवश्यक सुविधांनी युक्त असाव्यात,यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे,अशा सुचना मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया असल्याने,या शाळांच्या बळकटीकरणासाठी सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन नियोजनबद्ध काम करावे, असे सुचित करण्यात आले.

यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा मांडताना,“एकही शाळा बंद पडू नये”यावर ठाम भूमिका मांडण्यात आली.उलटपक्षी,जास्तीत जास्त नवीन शाळा उभारल्या जाव्यात आणि विद्यमान शाळांचा दर्जा उंचावला जावा,यासाठी नाशिक महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यावी,असे निर्देश देण्यात आले.विशेषतः विद्यार्थिनींसाठी प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छ,सुरक्षित आणि सुयोग्य स्वच्छतागृहांची उपलब्धता असणे अत्यावश्यक असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.या आढावा बैठकीला नाशिक महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी,विविध विभागांचे अधिकारी,सर्व नगरसेवक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी