वसुंधरा दिनानिमित्त महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते वृक्षारोपण
नाशिक :- वसुंधरा दिनी मनपाच्या वतीने वृक्षाची लागवड करून हरित उपक्रमास केलेली सुरुवात ही पर्यावरणाला मदत करणारी ठरणार असल्याचे मनोगत महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी व्यक्त केले.नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने वसुंधरा दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ महापौरांनी केला.या शुभारंभ प्रसंगी बोलताना महापौर हिमगौरी आहेर - आडके यांनी सांगितले की नाशिक शहरात उद्यान व उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्षाची लागवड हा हाती घेतलेला उपक्रम पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरणार आहे.लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन व संगोपन योग्य रीतीने होईल याची दक्षता आपण सर्वांनी घेऊन हरित नाशिकचा संकल्प करू असे सांगितले.शहरातील प्रत्येक प्रभागात हजार वृक्ष
लागवडीचा संकल्प - उपमहापौर विलास शिंदे
वृक्षांचे जतन, पाणीपुरवठा व देखभाल यासाठी स्वतंत्र नियोजनही करण्यात आले असून शहरातील प्रत्येक प्रभागात हजार वृक्ष लागवडीचा संकल्प असून त्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उपमहापौर विलास शिंदे यांनी यावेळी केले.चुंचाळे पांजरपोळ येथे मनपाचा ७ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला असून त्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,नगरसेवक सुरेश पाटील,निवृत्ती इंगोले,किरण राजवाडे,नितीन दातीर,नगरसेविका किरण गामणे,उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, उद्यान निरीक्षक प्रशांत परब,संजय गायकवाड,संतोष पाटील,दत्तू शिरसाठ,उदय जोशी,बबन निवेकर,जिंबाऊ शिरसाठ आदींसह मनपा पदाधिकारी,अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. नाशिक महापालिकेच्या वतीने पांजरपोळ परिसरात एकूण ४५० खड्डे आधीच खोदून तयार करण्यात आले होते.वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून उपक्रमाला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला.
पर्यावरणपूरक प्रजातींना प्राधान्य
चुंचाळे येथील पांजरपोळ जंगल परिसरात पावसाळ्यापूर्वी तब्बल ७ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.त्यात या उपक्रमांतर्गत कडुलिंब,पिंपळ,जांभूळ,बकुल यांसह विविध भारतीय प्रजातींच्या वृक्षांची निवड करण्यात आली आहे.स्थानिक हवामानाशी सुसंगत आणि पर्यावरणपूरक प्रजातींना प्राधान्य देण्यात आल्यामुळे या वृक्षांचे दीर्घकालीन संवर्धन शक्य होणार आहे.
पावसाळ्यापूर्वी वृक्षांची लागवड - विवेक भदाने
पावसाळ्यापूर्वी टप्प्याटप्प्याने ७ हजार वृक्षांची लागवड पूर्ण करण्याचा उद्यान विभागाचा मानस असून,लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षणाची जबाबदारी महापालिका आणि पांजरपोळ संस्थेकडून संयुक्तपणे पार पाडली जाणार आहे,अशी माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी यावेळी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा