सेवा हक्क दिवसानिमित्त सामूहिक शपथ लोकाभिमुख सेवेसाठी प्रशासनाचा निर्धार
नाशिक :- सेवा हक्क दिवसानिमित्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामूहिक शपथ देऊन नागरिकांना वेळेत,पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यलयातील मध्यवर्ती सभागृहात याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे,उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) प्रदीप वर्पे,नगरपालिका शाखेचे सह आयुक्त शाम गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते अमोल दंडगव्हाळ व राहुल देवरे (जिल्हा प्रकल्प प्रमुख, महा आयटी) यांचा सन 2025-26 या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा