नाशिक ग्रामीण पोलीस दलातील १२ अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- ग्रामीण पोलीस दलातील एकूण १२ पोलीस अंमलदारांना  पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांचे पदक जाहीर ०१ मे २०२६ महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस दलात प्रशंसनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करणाऱ्या एकूण १२ पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य यांचे पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, गुप्तवार्ता विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बिनतारी संदेश विभाग, प्रशिक्षण व खास पथके,एसआरपीएफ (SRPF),वाहतूक,महामार्ग,लोहमार्ग अशा विविध पथकांमधील गुणवत्ताधारक पोलीस अधिकारी व अंमलदारांना दरवर्षी पोलीस महासंचालकांचे पदक दिले जाते.गंभीर व क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावणे,गुन्हेगारांना जेरबंद करणे, राष्ट्रीय स्तरावर खेळात प्राविण्य,नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य,पोलिसांची प्रतिमा उजळ करणे,अशा विविध प्रकारे सतत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना गुणवत्तेच्या आधारे पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात येते.नाशिक ग्रामीण पोलीस दलातील एकूण १२ पोलीस अंमलदारांनी यावर्षी हा मान मिळवला आहे.
पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अंमलदार:

| अ.क्र. | हुद्दा | नाव | नेमणूक |
| १ | पोहवा | सोमनाथ बाजीराव हयाळीज | नियंत्रण कक्ष, आरसीपी, मालेगाव |
| २ | पोहवा | शरद पांडुरंग गांगुर्डे | जात पडताळणी विभाग, नाशिक |
| ३ | पोहवा | सचिन दिलीप धारणकर | स्थानिक गुन्हे शाखा, ना. ग्रा. |
| ४ | पोहवा | शांताराम पंढरीनाथ घुगे | विमानसेवा, ओझर |
| ५ | पोहवा | कैलास रामभाऊ खैरे | चांदवड पोलीस स्टेशन |
| ६ | पोहवा | सतीश रामनाथ जगताप | स्थानिक गुन्हे शाखा, ना. ग्रा. |
| ७ | पोहवा | दिनेश माधवराव पवार | नियंत्रण कक्ष, आरसीपी, मालेगाव |
| ८ | मपोहवा | करुणा अनिल आहेर | A.H.T.U. नाशिक ग्रामीण |
| ९ | मपोहवा | नीलिमा माधवराव मोरे | अर्ज शाखा, नाशिक ग्रामीण |
| १० | पोहना | प्रदीप श्रावण बहिरम | सायबर पो. स्टे. नाशिक ग्रामीण |
| ११ | चापोहवा | रमेश वामनराव काकडे | मोटार परिवहन विभाग, ना. ग्रा. |
| १२ | पोहवा | जितेंद्र शिवराम रायते | नागरी हक्क संरक्षण विभाग, नाशिक परिक्षेत्र |

नाशिक ग्रामीण पोलीस आस्थापनेवरील वरील पोलीस अंमलदारांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल मा. पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य यांचे पदक जाहीर झाल्याबद्दल नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
०१ मे २०२६ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पदक प्राप्त अंमलदारांचा पोलीस अधीक्षक कार्यालय,नाशिक ग्रामीण येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून,यावेळी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे पदक प्राप्त पोलीस अंमलदारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना प्रसिद्धी प्रमुख न्यूज च्यावतीने ही हार्दिक शुभेच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी