माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सतीश सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
संपूर्ण नाशिक शहराचा विकास हेच आपले प्रमुख ध्येय - माजी खासदार समीर भुजबळ
नाशिक,दि.४ जानेवारी :- राज्यात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महायुतीत घटक पक्ष म्हणून काम करत आहे.त्यामुळे या नाशिक शहराचा विकास करणे हेच आपले प्रमुख ध्येय असून आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने विविध विकासाची कामे मार्गी लावली जातील.लवकरच नाशिक शहराच्या विकासाचा रोड मॅप नाशिककरांच्या समोर घेऊन येत असून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा.खा. समीर भुजबळ यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक ३० चे उमेदवार सतीश बापू सोनवणे,यांच्या राजीव नगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आनंद सोनवणे,मंगलाताई मोरे,अनिता सोनवणे,संतोष कुलकर्णी,शैलेश कुलकर्णी,अविनाश टिळे,वेडूजी सोनवणे,रावसाहेब गायधनी,मंगेश जाधव,संतोष भुजबळ,प्रभाग क्रमांक ३० मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार योगेश वसंत दिवे, यांच्यासह युनिक ग्रुप,महिला मंडळ व प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ,म्हणाले की,मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून खासदार म्हणून काम करत असताना नाशिकमध्ये आपण विविध विकासाची कामे आपण केली.विमानतळ,उड्डाणपूल,बोट क्लब, नाशिक मुंबई रस्ता यासह विविध विकासाची कामे आपण केली आहे.खासदार असताना देखील सतीश सोनवणे,यांना आपण मदत करत कामे केली.पंधरा वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला बाजूला सारण्याचे काम करण्यात आले.सतीश सोनवणे यांच्यावर अन्याय झाला. त्यांचे काम चांगले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना संधी दिली.ते पक्षाने दाखविलेला विश्वास नक्कीच सार्थ करतील.ते म्हणाले की, गेल्या कालावधीत नाशिक महानगरपालिकेत नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही.मंत्री छगन भुजबळ,यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या विकासाचा रोड मॅप जनतेसमोर घेऊन येऊ तसेच आगामी सीएसटी कुंभमेळ्याच्या दृष्टीने अनेक विकासाची कामे मार्गी लावली जातील असे त्यांनी सांगितले.यावेळी प्रभागातील उमेदवार सतीश बापू सोनवणे म्हणाले की, प्रभागात गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामे मार्गी लावली आहेत प्रभागातील नागरिकांचे प्रश्न आपण संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्राधान्य आहे.विकासाचे चक्र अखंड सुरू राहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ,यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे मार्गी लावली जातील.आपण परिवर्तनाला मत द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रसंगी उपस्थित योगेश दिवे,म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत एकनिष्ठ राहून काम केलं.या कामाची दखल घेत माजी खासदार समीर भुजबळ,यांनी आपल्याला उमेदवारी दिली. त्यांनी ठेवलेला हा विश्वास आपण नक्कीच सार्थ करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या