कार्यक्रम पार पाडण्यासाठी नुतन विद्यामंदिर येथील शिक्षक ललित भदे,यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी वाघ, ज्योती परदेशी, कीर्ती उदावंत, सविता आहेर, रमेश चेवले, दिलीप गायकवाड, संजय बलकवडे, सुभाष ठुबे, श्याम डावरे, दिनेश झुटे, तुकाराम हांडगे,अजय चव्हाण, पंडित मोरे, बिस्मिल्ला खान,अमित लोखंडे, किरण पगारे, स्वप्निल वाघ, अरुण पगारे, सागर सोनकांबळे, सुरेश सातव, राहुल जमदाडे, साहिल अन्सारी, विनायक सोनवणे, सागर वाघ, मनोज वाघ, दहावीत सुतार समाधान पगारे, दिपाली वाघ, लताबाई गायकवाड, विशाल जाधव,यांनी विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते अमोल भागवत,यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.अनेक महान व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीचे काम केले. त्यांच्या क्षेत्रामध्ये कसे यश संपादन केले याविषयी सविस्तर माहिती दिली. मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष अविनाश वाघ, यांच्या कुटुंबीयांनी दोन विद्यार्थ्यांना रोख रक्कम दिली.कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. गरीब परिस्थिती असलेल्या निराधार विद्यार्थ्यांसाठी आयोजकांनी विद्यालयाकडून यादी घेतली आहे लवकरच त्यांनाही शालेय साहित्य वाटप करण्यात येईल असे आश्वासन आयोजकांनी दिले.
0 टिप्पण्या