महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नवीन सदस्यांची नियुक्ती राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी

मुंबई, दि. १ : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) राजीव निवतकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, निवतकर आणि वारभुवन यांना आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.
आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात हा शपथविधी सोहळा पार पडला. याप्रसंगी आयोगाचे सदस्य अभय वाघ आणि सतिश देशपांडे यांच्यासह आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात, सहसचिव तथा परीक्षा नियंत्रक सरिता बांधेकर- देशमुख, उपसचिव मा. पां. जाधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या