रोहन गुळवे यांचा मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी केला सत्कार


नाशिक :- कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी मधील टी. वाय. बी. एस्सी चा विद्यार्थी कु.रोहन कैलास गुळवे याची एकाच वेळी आर्मी मेडिकल कोअर मध्ये नर्सिंग असिस्टंट व इंडियन नेव्ही मध्ये सीनिअर सेकंडरी रीक्रूट म्हणून निवड झाली. या निवडीबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने सरचिटणीस ॲड. नितिन ठाकरे यांच्या हस्ते रोहन चा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष  विश्वास मोरे, इगतपुरी संचालक ॲड. संदीप गुळवे , संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नितिन जाधव, प्राचार्य डॉ. किरण रकिबे, एनसीसी ऑफिसर कॅप्टन. एस एस परदेशी आणि पदार्थविज्ञान विभागप्रमुख गोरख गांगुर्डे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या