पोस्ट्स

मे १०, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन - मंत्री आशिष शेलार

इमेज
राज्यात नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर भर मुंबई, दि. ११ : राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तीन तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. या समितीने देशातील विविध राज्ये तसेच परदेशातील चित्रपट उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये चित्रपट निर्मितीदरम्यान येणाऱ्या अडचणी, चित्रीकरणासाठी आवश्यक सुविधा, परवानग्या तसेच उद्योगवृद्धीसाठी आवश्यक धोरणात्मक बदल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत ...

मनपा प्रशासनाने बैठक आयोजित करून ऐनवेळी रद्द केल्याने प्रहार दिव्यांग संघटना पदाधिकारी संतप्त

इमेज
मनपा प्रशासनाने बैठक आयोजित करून ऐनवेळी रद्द केल्याने प्रहार दिव्यांग संघटना पदाधिकारी संतप्त विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- शहरातील दिव्यांगांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच राखीव आणि निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते त्या पत्रास अनुसरून नाशिक महानगरपालिकेने दिनांक 11 मे रोजी अकरा वाजता बैठक आयोजित केली असल्याचे लेखी पत्र पाठवून बैठकीस आमंत्रित केले होते. जेव्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे आले असता बैठक रद्द झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले तसेच अतिरिक्त आयुक्त व मनपा उपायुक्त समाज कल्याण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आयोगाच्या बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले दिव्यांग संघटनेची बैठक ही पूर्वनियोजित असतानाही मनपा अधिकारी हे हजर नसल्याने दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मनपा दिव्यांग निधी मधून दिव्यांगांना दरमहा 3000 ऐवजी 6000 रुपये अनुदान देण्यात यावे तसेच राखीव दिव्यांग निधी इतरत...