पणत्यांच्या लखलखत्या प्रकाशात दीपाली नगरात दीपोत्सवाचा आनंदोत्सव; सांजसुरांनी रंगली अविस्मरणीय संगीत मैफल

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
इंदिरानगर  :- पणत्यांच्या प्रकाशाने उजळलेले उद्यान,भक्तिगीतांचा स्वरमधुर गजर आणि लोकप्रिय गीतांची सुरेल बरसात अशा मंगलमय वातावरणात दीपाली नगर येथे दीपावली सांज व दीपोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. महागायक अभिजित कोसंबी,गायिका अपर्णा माडीवाले आणि मीनल धोडपकर यांच्या बहारदार गीतांनी उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.विनयनगर परिसर ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक मंडळ,भाजप आणि प्रभाग २३ मधील विविध सामाजिक मंडळांच्या संयुक्त विद्यमाने छाजेड उद्यानात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसंगी आ.देवयानी फरांदे  नगरसेविका रुपालीताई निकुळे यशवंत निकुळे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नेते सुहास फरांदे,सुनील फरांदे,भाजप गटनेते शाम बडोदे,पुर्व प्रभाग सभापती मंगला नन्नावरे,जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोडे नगरसेविका दीपाली कुलकर्णी,नगरसेविका सुप्रिया खोडे,नगरसेविका संध्या कुलकर्णी,अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश नन्नावरे,माजी नगरसेवक सुनील परशराम खोडे,मनिषा चंद्रकांत खोडे,सुनील माधव खोडे,आयोजक नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सदस्या रुपालीताई निकुळे,माजी नगरसेवक यशवंत निकुळे,सचिन नन्नावरे आदींसह मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक महिला भगिनी उपस्थित होत्या.‘सूर निरागस हो गणपती’ या गीताने मैफलीचा श्रीगणेशा झाला.त्यानंतर अभिजित कोसंबी यांनी ‘राधा ही बावरी’,‘भेटला विठ्ठल माझा’,‘गालावर खळी’,‘माझी रेणुका माऊली’आली माझ्या घरी ही दिवाळी यांसह लोकप्रिय आणि भक्तिगीतांची सुरेल मेजवानी सादर केली.अपर्णा माडीवाले,आणि मीनल धोडपकर,यांच्या स्वरांनीही मैफलीत रंगत आणली.प्रत्येक नागरिकाने दोन पणत्या आणण्याच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने छाजेड उद्यान दीपमाळांनी उजळून निघाले.आ.देवयानी फरांदे यांनी उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासह कलासंस्कृतीला प्रोत्साहन आणि आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आवश्यक विकासकामांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.यावेळी अनिल धुमाळ (की-बोर्ड),देवानंद पाटील व प्रतीक पाटील (ऑक्टोपॅड) किरण गायधनी,अनिल धुमाळ,आशिष विश्वकर्मा यांनी साथसंगत केली.सचिन जाधव यांनी निवेदन केले.विविध सामाजिक व ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या