सकल मराठा परिवाराच्या वतीने किल्ले रामशेजवर दीपमहोत्सव उत्साहात संपन्न; शिवव्याख्यानांतून इतिहासाचा जागर!

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- सकल मराठा परिवाराच्या वतीने किल्ले रामशेज येथे आयोजित करण्यात आलेला 'दीपमहोत्सव २०२६' मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात संपन्न झाला. 'एक दिवा स्वराज्यासाठी, एक दिवा आपल्या शिवरायांसाठी' या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक,महिला,युवक,विद्यार्थी आणि बालगोपाळांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.सकल मराठा परिवार हा कार्यक्रम मागील 6 वर्षापासुन नियमित करत आहे. दिपावली सुरवात करताना पहिला दिवा हा छत्रपती च्या चरणी अर्पण केला जातो.कार्यक्रमाची सुरुवात गडस्वच्छतेने झाली.श्रीराम मंदिर,भवानी माता मंदिर,हत्ती दरवाजा आणि मुख्य पठार परिसरात दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली.याप्रसंगी 51 मशाल व 501 दिवे लागण करण्यात आली.त्यानंतर मशालींच्या प्रकाशात आणि पारंपरिक गोंधळी वाद्यांच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी शिवव्याख्याते समाधान हेगडे पाटील, शिवव्याख्यात्या साक्षीदीदी ढगे आणि गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ यांनी शिवचरित्र, किल्ले रामशेजचा साडेसहा वर्षांचा ऐतिहासिक लढा तसेच गडकोट संवर्धनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.सकल मराठा परिवाराचे प्रमुख खंडू आहेर यांनी परिवाराच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले तसेच नाशिक जिल्ह्यात किल्ले धोडप परिसरात उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीची माहिती देण्यात आली.भवानी मातेची आरती आणि सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.हा दीपमहोत्सव केवळ दिव्यांचा उत्सव न ठरता शिवइतिहासाचे स्मरण,गडकोट संवर्धनाचा संकल्प आणि सामाजिक एकजुटीचा प्रेरणादायी सोहळा ठरला.या सोहळ्यासाठी सकल मराठा परिवारातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम अगदी उत्सहात सपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या