वडाळा :- कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, वडाळा येथे संस्थेच्या समन्वयिका डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.विभागीय अंबड पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचारी रीना देशमुख व कल्पना वाळुंज यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुरक्षा,व्यसनांचे दुष्परिणाम, वाहतूक नियम आणि मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेकडे प्रवृत्त करणाऱ्या अपप्रवृत्तींविरोधात जागरूक राहण्याचे आवाहन केले.यावेळी गरबा, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
उत्कृष्ट गरबा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. मुख्याध्यापक सतीश लिंडाईत सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत गरब्यामुळे मानसिक, शारीरिक व भावनिक स्थैर्य मिळण्यास मदत होते, असे सांगितले. त्यांनी दामिनी पथकाचे स्वागत करून आभार मानले.पर्यवेक्षक महेंद्र बाविस्कर व संदीप पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या