विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एक पुस्तक वाचावे- मुख्याध्यापिका शरयू भामरे


नाशिक :- विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचावे,असे आवाहन जनता विद्यालय, गांधीनगरच्या मुख्याध्यापिका शरयू भामरे यांनी केले.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
वाचनामुळे विचारशक्ती विकसित होते आणि नवनिर्मितीची क्षमता वाढते.आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य असून, देशाच्या विकासासाठी त्यांचा वैचारिक विकास आवश्यक आहे. तरुणांना केवळ शिक्षित न ठेवता विचारांनी समृद्ध आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणारे बनविण्यासाठी घराघरांत वाचनसंस्कृती रुजविणे गरजेचे आहे, असे भामरे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका गीता गडाख, उज्वला जोरी, माधुरी मोरे, मंगला गांगुर्डे, माधवी गांगुर्डे, निशा पाटील, रूपाली सोनवणे, ज्योती काळोगे, सुवर्णा जाधव, शोभा मगर, अर्चना जाधव तसेच ज्येष्ठ शिक्षक हेमंत पाटील, नितीन शिंदे, सतीश पाटील व ज्ञानेश्वर राजोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कृष्णा जाधव यांनी फलकलेखन केले. नंदिनी गावले यांनी सूत्रसंचालन केले, तर आबासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या