(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक ;- महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती अश्विन पौर्णिमा या तिथीनुसार साजरी करण्यात आली.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर व सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास नगर सचिव संजय नेरकर,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,अधीक्षक गणेश ठुमसे,प्रदीप नवले,मनीषा पाटेकर,साहेबराव भोसले,राहुल शार्दूल,विजय दौडे,विलास इंगळे,मुकेश बैरागी,तुषार पटाईत,शामली वाघचौरे,पल्लवी वक्ते,प्रवीण गायकवाड,मनोज गायकवाड,
श्रीकांत भोई,आकाश शिनगाण,मनोज गायधनी,रमेश पागे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या