नाशिक :- केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत मनपा क्षेत्रातील २२१ परीक्षा केंद्रांवर चाचणी घेण्यात आली.
रविवार, दि.२५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०५.०० या वेळेत मनपा क्षेत्रातील २२१ परीक्षा केंद्रांवर असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLNAT) चाचणी घेण्यात आली.या परीक्षेसाठी एकूण २६३३ असाक्षर व्यक्ती सहभागी झाले होते.सहभागी असाक्षर व्यक्तींना मूलभूत वाचन, लेखन व संख्याज्ञान कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण चाचणी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षा केंद्रावर २२१ केंद्रसंचालक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्या आहे.मनपा प्रशासनाच्या वतीने आणि मनपा प्राथमिक व माध्यमिक तसेच खाजगी विविध शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहभागातून ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमातून असाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे.
(डॉ. मिता चौधरी) प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग, नाशिक
0 टिप्पण्या