मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचाल तर वाचाल’चा संदेश
(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती आणि 'मिसाईल मॅन' भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला.मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी मंडळ तसेच शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ग्रंथालय समितीचे सदस्य सचिव प्रा. मिलिंद देशपांडे, सदस्य डॉ. सुप्रिया ढाकणे, डॉ. राहुल कोप्पीकर, डॉ. अनुपम खरे उपस्थित होते. ग्रंथपाल नितेश मते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.   
यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे पुस्तके वाचून शैक्षणिक अध्ययन प्रगती साधावी, आजवर अनेक थोर विचारवंत पुस्तकांचे वाचन करूनच घडले असून, विद्यार्थ्यांनी नियमित वाचन केले तरच आयुष्यात यश संपादन होते, असे विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. सुप्रिया ढाकणे, एमबीबीएसचा विद्यार्थी ओंकार होले यांनीही मनोगत व्यक्त केले. पूजा एरंडोले, गजानन जाधव यांनी सूत्रसंचालन तर प्रा. मिलिंद देशपांडे यांनी आभार मानले.याप्रसंगी फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल जयश्री ठाकरे, परिचर्या शिक्षण संस्थेच्या ग्रंथपाल संगीता बिडगर, फार्मसीचे सहाय्यक ग्रंथपाल विक्रांत मोगल, गोकुळ ठोंबरे, मीडिया सेल समन्वयक योगेश सगर, निता नलावडे, कोमल पाचोरकर, अर्चना टर्ले, मीना मते यांच्यासह मध्यवर्ती ग्रंथालयाचे सर्व शिक्षकेतर सेवक, प्रथम वर्ष एमबीबीएसचे विद्यार्थी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या