नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम बी.डी.भालेकर हायस्कूल शेजारील त्रंबक रोड येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,यांनी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री ना.गिरीश महाजन,महापौर हिमगौरी आहेर आडके,आमदार प्रा.देवयानी फरांदे,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनीषा खत्री,आदींसह गटनेते पदाधिकारी,सभापती, नगरसेवक,नगरसेविका,अधिकारी आदी उपस्थित होते.
तसेच नाशिक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथेही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे,व उपायुक्त नितीन नेर,यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास गटनेत्या सीमा ठाकरे,नगरसचिव संजय नेरकर,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,मनीषा पाटेकर,साहेबराव भोसले,भास्कर गवारे,वैशाली घावटे,बेबी वझरे,मयूर चराटे, विलास पाटील,निलेश वेळीस,विजय खोडे,भाऊसाहेब ताजनपुरे,सुशील सोनवणे आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या