(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- महानगरपालिका महापौर दालनात महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या उपस्थितीत शहरातील बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदारांची तातडीची बैठक घेण्यात आली. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.खड्डे बुजविण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा दिरंगाई सहन केली जाणार नाही,तसेच तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा वाढवून युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे सक्त निर्देश महापौर हिमगौरी आहेर आडके,यांनी दिले.नाशिककरांना खड्डेमुक्त,सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक कामावर वैयक्तिक लक्ष ठेवले जाईल, नाशिक शहर आणि शहरातील नागरिक हीच आमची प्रार्थमिकता आहे.असेही महापौर हिमगौरी आहेर आडके याप्रसंगी म्हणाल्या.यावेळी उपमहापौर विलास शिंदे,शहर अभियंता संजय अग्रवाल,कार्यकारी अभियंता प्रशांत पगार,नवनीत भांबरे,संदेश शिंदे,रवींद्र पाटील,रवींद्र बागुल तसेच उपअभियंता निलेश साळी,नितीन राजपूत,हेमंत नांदुर्डीकर,भरत ठाकरे,प्रशांत बोरसे,सुरेश पाटील, यांच्यासह संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
0 टिप्पण्या