नाशिक शहर कार्यक्षेत्रात 26 ऑगस्टपर्यत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

नाशिक :- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 12 ऑगस्ट रोजी मध्य रात्रीपासून ते 26 ऑगस्ट रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.सदरचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा,चित्रपटगृह आदींसाठी लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येईल,असेही संदीप कर्णिक,यांनी आदेशात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या