नाशिक :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय नाशिक मार्फत इतर मागासवर्गीयांच्या कल्याण, विकास व उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. सन 2026-27 या वित्तीय वर्षासाठी महामंडळाकडून जिल्ह्यासाठी भौतिक व आर्थिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.व सर्व योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. पात्र इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,जिल्हा कार्यालय नाशिकचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.सन 2026-27 या वित्तीय वर्षासाठी 20 टक्के बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना (रूपये 1 लक्ष पर्यंत), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रूपये 15 लक्ष पर्यंत),गट कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रूपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त 50 लक्ष पर्यंत), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रूपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त 20 लक्ष पर्यंत),महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास योजना अशा 7 योजना मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहेत.या सर्व योजनांचे मुख्यालयाने दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याचे प्रस्तावित आहे.अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, नाशिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन,नासर्डी पुलाजवळ,नाशिक कार्यालयात अथवा दूरध्वनी क्रमांक 0253-2236073 यावर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या