नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने दि. 31 जुलै 2026 रोजी राजीव गांधी भवन येथे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी नाना बाबू जंकर,राजेंद्र रामचंद्र भावाने,श्रीमती जिजा बोडके,शिरीष केशव आननहोळी,बाळू अनंत गायकवाड व कैलास जनार्दन शेरताटे यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमा प्रसंगी समाज कल्याण विभागाचे उप आयुक्त नितिन नेर कामगार कल्याण विभागाचे सहा.अधिक्षक नितिन बागुल यांचे उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. कार्यक्रमास कामगार कल्याण विभाचे विनय काळे,सहा.राजेंद्र सोनार,सहा.अधिक्षक सोमनाथ कासार,मिलिंद बदादे,प्रकाश ताजणे,उपस्थित होते.उपस्थितांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या